भावाला जीवे मारण्याची धमकी; तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी जळगावात गुन्हा दाखल

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील तांबापुरा मच्छी मार्केट परिसरात एका १८ वर्षीय तरुणीवर धमकावून अत्याचार करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाकीब अस्लम पटेल (वय २०, रा. तांबापुरा, मच्छी मार्केट, जळगाव) याने पीडित तरुणीच्या भावाला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर दबाव टाकला. १ नोव्हेंबर २०२५ ते २० मे २०२६ या कालावधीत आरोपीने तरुणीला तिच्या राहत्या घरी वारंवार बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, अशी तक्रार पीडितेने दिली आहे.

या प्रकारामुळे संबंधित तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर आरोपीने गर्भपाताच्या गोळ्या आणून त्या घेण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे पुढील तपास करत आहेत.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६४(२)(m), ८९ व ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मेहरुणमध्ये एस.आय.आर. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण परिसरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २९ जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १०...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा,...

जळगाव(प्रतिनिधी ):जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा,...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विशाखा...

मेहरुण (प्रतिनिधी) : महिलांना कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानपूर्ण व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक...

संपादक - रजत शेख

Latest