व्यसनाला नकार, जीवनाचा स्वीकार; विद्यार्थ्यांचा नशामुक्त भारताचा संकल्प

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरून येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे आरोग्य व कल्याण समितीच्या वतीने “व्यसन विरुद्ध जीवन” हा नाविन्यपूर्ण जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देत नशामुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला.

उपक्रमात विद्यार्थ्यांसमोर “व्यसन” आणि “जीवन” या दोन संकल्पनांचे प्रतीकात्मक सादरीकरण करण्यात आले. व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम तसेच निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने “मी जीवनाची निवड करतो, व्यसनाची नाही” असा संकल्प लिहून हिरव्या जीवनवृक्षावर चिकटवला. तसेच “व्यसनाला नकार – जीवनाचा स्वीकार” आणि “नशामुक्त भारत – विकसित भारत” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारतासाठी शपथ घेतली.

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाली. हा संदेश आपल्या कुटुंबापर्यंत व समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धारही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

 

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून निरोगी, सुदृढ आणि जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. आरोग्य व कल्याण समितीच्या प्रमुख उज्ज्वला नन्नवरे यांनी उपक्रमाचे नियोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच रूपाली आव्हाड यांनी व्यसनमुक्तीबाबत प्रभावी समुपदेशन करून व्यसनाचे दुष्परिणाम आणि निरोगी जीवनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

 

शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest