गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक

Spread the love

मेहरुण : (प्रतिनिधी):

सध्याच्या इंधन व गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पर्यायी ऊर्जा स्रोतांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इको क्लबच्या वतीने बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इको क्लब प्रमुख रूपाली आव्हाड यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना जैविक कचऱ्यापासून पर्यावरणपूरक इंधन तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली.

सुकी पाने, शेतीतील अवशेष, भुसा आदी जैविक पदार्थांचा योग्य वापर करून त्यापासून बायो ब्रिकेट्स अर्थात पर्यायी इंधन तयार करता येते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या माध्यमातून ऊर्जा बचत, जैविक कचऱ्याचा पुनर्वापर, पर्यावरण संवर्धन आणि पर्यायी ऊर्जास्रोतांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले.

 

कचऱ्याकडे समस्या म्हणून न पाहता त्याचा पुनर्वापर करून उपयुक्त साधनांची निर्मिती करता येते, हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोपक्रमशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता तसेच सामाजिक व पर्यावरणीय जाणीव विकसित होण्यास मदत होते, असे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest