आरटीओ पासिंगसाठी ७ हजारांची लाच स्वीकारताना खासगी एजंट जेरबंद

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान ): दिव्यांग तक्रारदाराच्या कारचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी एजंट योगेश रामभाऊ पाटील (वय ३९, व्यवसाय एजंट, खान्देश मोटर्स शोरूम, जळगाव, रा. आदर्शनगर, जुना आरटीओ कार्यालयाजवळ, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

 

तक्रारदार हे ४१ वर्षीय खासगी वकील असून दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. त्यांनी १ जुलै २०२६ रोजी खान्देश मोटर्स शोरूममधून मारुती कंपनीची अल्टो के-१० व्हीएक्सआय कार खरेदी केली होती. या कारची ३ ऑगस्ट रोजी आरटीओ कार्यालयात तात्पुरती नोंदणी करण्यात आली होती.

 

तक्रारदारांनी कारमध्ये हॅण्ड कंट्रोल बसविल्यानंतर १२ ऑगस्ट रोजी कायमस्वरूपी पासिंगबाबत चौकशी करण्यासाठी आरटीओ कार्यालयात भेट दिली. यावेळी खासगी एजंट योगेश पाटील याने आरटीओ कार्यालयातील अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांच्या नावाने काम करून देण्यासाठी सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ८ हजार ५०० रुपयांची मागणी करण्यात आली.

 

याबाबत तक्रारदारांनी १७ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली. तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता योगेश पाटील याने तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविली.

 

त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी इच्छादेवी चौकातील बजाज टीव्हीएस शोरूम येथे सापळा रचण्यात आला. यावेळी योगेश पाटील याने पंचांसमक्ष ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्याला ताब्यात घेण्यात आले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

 

ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर होते. सापळा पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार सुनील वानखेडे आणि पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांचा समावेश होता.

 

कारवाईस ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शन ना खाली करण्यात आली आहे


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest