पहुर पोलिसांची कारवाई; मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस, दोन दुचाकी हस्तगत

Spread the love

पहुर (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पहुर पोलिसांनी कारवाई करत एका संशयित आरोपीस अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

पहुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १८७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपी आकाश सुभाष गुजर (वय २८, रा. नांदनखेडा, ता. जामनेर) याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

 

सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने दोन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून पुढील दुचाकी हस्तगत करण्यात आल्या—

 

– हिरो फॅशन प्रो मोटारसायकल क्र. MH-19-BV-8899 — किंमत १५ हजार रुपये.

– हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. MH-19-DK-4013 — किंमत २५ हजार रुपये.

 

अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्री. अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग श्री. बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, पोहेकॉ. सचिन चौधरी, पोहेकॉ. राहुल पाटील, पोना. दीपक पाटील, पोकॉ. ईश्वर कोकणे, पोकॉ. सत्यवान कोळी, पोहेकॉ. विकास गायकवाड तसेच चालक पोहेकॉ. हेमंत सोनवणे यांनी सहभाग घेतला.

 

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना. दीपक पाटील करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest