सराफाच्या दुकानातून हातचलाखीने चोरी; फरार आरोपी अकोल्यातून जेरबंद, ४७.४८ ग्रॅम सोने जप्त

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी ): सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोने लंपास करून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अकोला शहर परिसरातून आरोपी मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापा नगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन गुन्ह्यांतील एकूण ४७ ग्रॅम ४८० मिलीग्रॅम सोन्याचा, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२९/२०२६ आणि बोदवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपी फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.

 

दरम्यान, आरोपी अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोला येथे रवाना झाले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.

 

आरोपीकडे गुन्ह्यांतील चोरीच्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील ३२ ग्रॅम ४०० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड, अंदाजे ३ लाख २० हजार रुपये किमतीची, पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.

 

तसेच बोदवड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता आरोपीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार १५.०८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. अशाप्रकारे दोन्ही गुन्ह्यांतील एकूण ४७.४८ ग्रॅम सोन्याचा, सुमारे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

 

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हवालदार उमाकांत पाटील, गोपाळ गव्हाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, पोलीस हवालदार संदिप चव्हाण, चालक पोलीस कॉन्स्टेबल रिजवान शेख यांनी सहभाग घेतला. तांत्रिक मदत पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी केली.

 

ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोलीस हवालदार विकास यशवंत बाविस्कर करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest