श्रावणानिमित्त विद्यार्थ्यांनी साकारला मानवी त्रिशूळ

Spread the love

मेहरुण(प्रतिनिधी ): श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी शरीररचनेतून आकर्षक ‘मानवी त्रिशूळ’ साकारत श्रावणाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.

 

भगवान शिवाचे प्रतीक असलेल्या त्रिशूळाची भव्य प्रतिकृती विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साकारली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये एकता, संघभावना, शिस्त, सहकार्य तसेच भारतीय संस्कृतीविषयी जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

 

उंचीवरून टिपलेल्या छायाचित्रात विद्यार्थ्यांनी साकारलेला मानवी त्रिशूळ विशेष आकर्षण ठरला. धार्मिक प्रतीकाला विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची जोड देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे पालक तसेच परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

 

या उपक्रमासाठी इयत्ता तिसरी व चौथीच्या शिक्षिका स्वाती नाईक, कल्याणी महाजन व सोनाली चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका शितल कोळी यांच्या सहकार्याने उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

 

श्रावणातील भक्तीला विद्यार्थ्यांच्या एकतेची, शिस्तीची आणि सर्जनशीलतेची जोड देणारा हा मानवी त्रिशूळ उपक्रम शाळेच्या अभिनव उपक्रमांमध्ये लक्षवेधी ठरला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest