जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान)अजिंठा चौफुली महामार्गावरील सातपुडा शोरूमसमोर शुक्रवार दुपारी सुमारे 1.30 वाजेच्या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस अचानक बंद पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने बसच्या मागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

बस रस्त्याच्या मध्यभागी बंद पडल्यामुळे इतर वाहनचालकांना पुढे जाण्यास अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती. घटनेची माहिती मिळताच एस टी महामंडळाचे कार्यशाळेतील तांत्रिक टीम संबंधित बस जवळ पोहोचून बस दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले.








