जळगाव(प्रतिनिधी :इमरान खान): दि. १६ जुलै : रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘झिरो फेटालिटी’ मोहिमेअंतर्गत जळगाव शहर वाहतूक शाखेने गुरुवारी (१६ जुलै) शहरातील विविध भागांत विशेष तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या १८९ वाहनचालकांवर कारवाई केली.

या मोहिमेत ६ अल्पवयीन चालक, १ अवैध प्रवासी वाहतूक प्रकरण, १२२ विना परवाना (लायसन्स) वाहनचालक, ५ तिघेजण एकाच दुचाकीवर प्रवास करणारे, १ मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणारा, ६ विना सीटबेल्ट, १२ विना हेल्मेट, तसेच इतर २६ नियमभंगाच्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.

ही विशेष मोहीम जळगाव शहरातील बसस्थानक, कालिंका माता परिसर तसेच सायंकाळी ५ ते ७ या वेळेत शिव कॉलनी परिसरात विशेष नाकाबंदी करून राबविण्यात आली.
या कारवाईदरम्यान एकूण १ लाख ८७ हजार ६०० रुपयांचे ई-चलन करण्यात आले असून, १ हजार ५०० रुपयांचा रोख दंड जागीच वसूल करण्यात आला.
शहरातील वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी दिली.








