अमळनेरमध्ये बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यावर एलसीबीची धडक; ४.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त, १८ जणांविरुद्ध गुन्हा

Spread the love

अमळनेर(प्रतिनिधी):

अमळनेर शहरातील दोन ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यांवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अमळनेर पोलिसांच्या संयुक्त पथकासह धडक कारवाई करत तब्बल ४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १८ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेला पारधीवाडा परिसरातील मुस्लिम कब्रस्तानामागील कत्तलखाना तसेच जपान जिन परिसरातील पत्राशेडमध्ये बेकायदेशीरपणे गोवंशाची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर ३ जुलै रोजी एलसीबी व अमळनेर पोलिसांच्या संयुक्त पथकाने दोन्ही ठिकाणी एकाचवेळी छापा टाकला.

या कारवाईत १,५७५ किलो गोमांस (किंमत ३ लाख १५ हजार रुपये), तीन गावरान बैल (किंमत १ लाख ५५ हजार रुपये) तसेच चार लोखंडी कुऱ्हाडी, नऊ सुऱ्या, सहा कोयते आणि दोन वजनकाटे (किंमत ३ हजार रुपये) असा एकूण ४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४६/२०२६ नोंद करण्यात आला असून, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ (२०१५ सुधारणा) मधील कलम ५, ५-अ, ९, ९(अ), ९(ब), प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २९९ व ३२५ अन्वये १८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र बल्टे, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे तसेच एलसीबी व अमळनेर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली. पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest