‘ग्रीन बॅग गॅलरी’ प्रदर्शनातून प्लास्टिकमुक्तीचा संदेश; संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा अभिनव उपक्रम

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी): शहरातील रामेश्वर कॉलनी येथील श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक येथे रोजी आज

 

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘ग्रीन बॅग गॅलरी’ या अभिनव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्यांवर पर्यावरणपूरक संदेश व आकर्षक चित्रे साकारत प्लास्टिकमुक्तीचा प्रभावी संदेश दिला.

 

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी घरातून कापडी पिशव्या आणून त्यावर “प्लास्टिकला नकार – कापडी पिशवीचा स्वीकार”, “माझी पिशवी, माझी जबाबदारी”, “पृथ्वी वाचवा, प्लास्टिक टाळा”, “Go Green, Keep Earth Clean” असे विविध संदेश आणि चित्रे रेखाटली. त्यानंतर या पिशव्यांचे ‘ग्रीन बॅग गॅलरी’च्या माध्यमातून आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांची कल्पकता, कलात्मकता आणि पर्यावरणाविषयीची जागरूकता उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.

 

यावेळी विद्यालयाच्या पर्यावरण समितीच्या अध्यक्षा रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना “प्लास्टिकला नकार, कापडी पिशवीचा स्वीकार” अशी पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली. दैनंदिन जीवनात कापडी व पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करण्याचे तसेच पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून समाजात प्लास्टिकमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढली असून, प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्याची प्रेरणा मिळाली. प्रदर्शनाला शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

हा उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पर्यावरण समितीच्या अध्यक्षा रूपाली आव्हाड आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest