राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची पालकांना माहिती; संत ज्ञानेश्वर विद्यालयात पालक-शिक्षक सभा उत्साहात

Spread the love

मेहरूण (प्रतिनिधी: सरिता महाजन): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पहिली पालक-शिक्षक सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्यावर सभेत विशेष भर देण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी पालकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये केवळ पाठांतरावर भर न देता कौशल्याधारित शिक्षण, कृतीतून शिकणे, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, वाचन संस्कृती आणि जीवनकौशल्यांचा विकास करण्याला प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

तसेच शाळेत राबविण्यात येणारे ‘एक विद्यार्थी – एक कौशल्य’, पर्यावरण संवर्धन, वाचन आनंद, जलसंवर्धन, प्रथमोपचार प्रशिक्षण आदी विविध उपक्रमांची माहितीही पालकांना देण्यात आली. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, घरातील अभ्यासाचे नियोजन, मोबाईलचा मर्यादित वापर, वैयक्तिक स्वच्छता तसेच पालकांनी शाळेशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले.

 

सभेच्या शेवटी पालकांनी विविध सूचना मांडत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा आणि पालक यांनी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या पालक-शिक्षक सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest