वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाला QR कोडद्वारे डिजिटल ओळख

Spread the love

मेहरूण (प्रतिनिधी) : वटपौर्णिमेच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील वडाच्या झाडाला QR कोडद्वारे डिजिटल ओळख देण्यात आली असून, स्कॅन करताच झाडाची संपूर्ण माहिती मोबाईलवर उपलब्ध होत आहे.

QR कोडमध्ये वडाचे शास्त्रीय नाव, पर्यावरणीय महत्त्व, औषधी उपयोग, सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व तसेच वृक्षसंवर्धनाचा संदेश समाविष्ट करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि उपस्थित महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली.

वटपौर्णिमेनिमित्त विद्यार्थिनींनी उपस्थित महिला व बालकांना वडाच्या झाडाचे महत्त्व समजावून सांगितले. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची माहिती देत वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

पर्यावरण समितीच्या अध्यक्षा रुपाली आव्हाड यांनी पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज अधोरेखित केली. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. पर्यवेक्षिका शितल कोळी व पर्यवेक्षक निलेश पवार यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व समजावून सांगत वृक्षसंवर्धनाची शपथ दिली.

या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण शिक्षणाची आवड वाढण्यास मदत झाली असून वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक आरोपी...

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला अटक केली. आरोपीकडून सुमारे २० हजार रुपये...

मंदिरातील पुजाऱ्याची निर्घृण हत्या; भुसावळ शहरात खळबळ

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरालगतच्या मिलिटरी स्टेशन कॅम्पस व झेडटीआरआय बोगद्याजवळील कालिका माता मंदिराचे पुजारी संतोष रघुवीर मंचल (वय ५५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात जड...

संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण समितीचा अभिनव उपक्रम; वारकऱ्यांना एक...

मेहरूण (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील पर्यावरण समिती व सीड...

संपादक - रजत शेख

Latest