शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा ऐवज लंपास, दोन संशयित ताब्यात

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी):

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी घरातून सुमारे ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील भगतसिंग चौक परिसरातील घर क्रमांक १९६ मध्ये राहणारे सुशील भाऊलाल भावसार (वय ६१) यांच्या घरी २५ जून रोजी रात्री १० ते २६ जून रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली.

चोरट्यांनी घरातील ४२ हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप, १५ हजार रुपये किमतीचा नोकिया अँड्रॉइड मोबाईल, १ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, दोन किलो वजनाची पितळी कढई (२ हजार रुपये) तसेच ३ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी राफत शेख फिरोज आणि शारिम शेख मुसेफ उर्फ मुसाब या दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. योगेश पाटील पुढील तपास करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; घरफोडीचा गुन्हा अवघ्या पाच...

जळगाव( प्रतिनिधी): जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या पाच तासांत उघडकीस आणत जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे....

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावाजवळ गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत १७ लाख ५० हजार...

घरफोडी प्रकरण उघड; 73,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी...

नांदेड(प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यातील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 73 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे....

संपादक - रजत शेख

Latest