संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरण समितीचा अभिनव उपक्रम : रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे भविष्यासाठी पाण्याची बँक

Spread the love

मेहरूण (प्रतिनिधी: सरिता महाजन) : वाढती पाणीटंचाई आणि भूजल पातळीत होत असलेली घट लक्षात घेऊन श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे पर्यावरण समितीच्या वतीने “रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे भविष्यासाठी पाण्याची बँक” हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

 

विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पावसाचे पाणी साठविण्याचे महत्त्व, पाण्याचे संकलन आणि जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्याच्या विविध उपायांची माहिती देण्यात आली.

 

पर्यावरण समितीचे अध्यक्ष कृपया आव्हाड यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व, पाणी बचतीचे उपाय तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना सविस्तरपणे समजावून सांगितली. यावेळी शाळेतील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची माहिती देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

 

उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी “पाणी अडवा, पाणी जिरवा” तसेच “थेंब थेंब पाणी, जीवनाची कहाणी” अशा घोषणांद्वारे जलसंवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि पाणी बचतीबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले.

 

मुख्याध्यापक मुकेश नाईक, पर्यवेक्षक निलेश पवार, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest