जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघात महायुतीचा दणदणीत विजय; नंदकिशोर महाजनांना ५८२ मतांची मोठी आघाडी

Spread the love

जळगाव, दि. २२ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला. महाजन यांना तब्बल ५८२ मते मिळाल्याने त्यांचा विजय दणदणीत ठरला.

या निवडणुकीत एकूण ६१६ पैकी ६११ वैध मते नोंदविण्यात आली. त्यापैकी महाजन यांनी ५८२ मतांसह स्पष्ट वर्चस्व राखले. इतर उमेदवारांमध्ये शरद शामराव तायडे यांना १७ मते, अनिल छबिलदास चौधरी यांना ११ मते, तर रेश्मा कुंदन काळे यांना केवळ १ मत मिळाले. तसेच ५ मते अवैध ठरली.

मतमोजणीच्या तिन्ही टेबलांवर महाजन यांना आघाडी मिळाली. टेबल क्रमांक १ वर २०७, टेबल क्रमांक २ वर १९१ आणि टेबल क्रमांक ३ वर १८४ मते मिळवत त्यांनी एकूण ५८२ मतांचा टप्पा गाठला.

मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते नंदकिशोर महाजन यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अमोल जावळे तसेच भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीच्या बळकटीचे हे द्योतक मानले जात असून, महाजन यांच्या विजयामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest