चाळीसगावात मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, दोन दुचाकी जप्त

Spread the love

  • चाळीसगाव( प्रतिनिधी ): चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी तपास करून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
  • पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जून २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. २८९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना, चोरीस गेलेली एचएफ डिलक्स मोटारसायकल राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) याने चोरल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
  • माहितीची खातरजमा करून राहुल भिसे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने चोरीची एचएफ डिलक्स मोटारसायकल प्रशांत दीपक राजपूत (रा. हरीगिरी बाबा नगर, पाटणादेवी रोड, चाळीसगाव) याला विकल्याची कबुली दिली. त्यानुसार प्रशांत राजपूत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, राहुल भिसे याने सदर मोटारसायकल २० हजार रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले. मोटारसायकलचे आरसी बुक मागितल्यावर आरोपीने टाळाटाळ केल्याची माहितीही समोर आली.
  • या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एकूण ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या असून आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
  • दरम्यान, त्याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत असताना अहिल्याबाई होळकर चौक परिसरात एक इसम विनानंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलविषयी समाधानकारक माहिती देता न आल्याने त्याच्या ताब्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड मोटारसायकल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे.
  • ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ भूषण पाटील व त्यांच्या पथकाने केली. या पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest