पिंपळगाव हरे पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्तुलासह आरोपी जेरबंद

Spread the love

पाचोरा(प्रतिनिधी ):दि. १३ जून – जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पिंपळगाव हरे पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे २० हजार रुपये किंमतीचे मॅगझीनसह गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध शस्त्रधारकांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पिंपळगाव हरे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी कल्याणी वर्मा यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे कारवाया करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, शनिवारी (दि. १३) सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सातगाव (ता. पाचोरा) परिसरात किशोर लक्ष्मण पाटील हा इसम कमरेला गावठी कट्टा लावून संशयास्पदरीत्या फिरत आहे. माहितीची खातरजमा करून कारवाई करण्यासाठी पोहेकॉ. अतुल पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना करण्यात आले.

पथकाने सातगाव परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याची झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या ताब्यातून मॅगझीनसह एक गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी तत्काळ शस्त्र जप्त करून आरोपीला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव किशोर लक्ष्मण पाटील (वय ३२, रा. सार्व पिंप्री, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे आहे. त्याच्याविरोधात पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९४/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहेरे, अमोल पाटील, प्रमोद वाडोले आणि नामदेव इंगळे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

वरणगावात अनिल चौधरींना सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रतिसाद; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

वरणगाव (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांनी वरणगाव येथे...

जळगावकरांसाठी आनंदाची बातमी! ‘गणराज मोबाईल’मध्ये एकाच छताखाली अनेक सेवा

जळगाव( प्रतिनिधी) : शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील धनदाई मंदिराजवळ असलेले गणराज मोबाईल हे ग्राहकांसाठी बहुउपयोगी सेवा केंद्र म्हणून लोकप्रिय ठरत आहे. मोबाईल रिचार्जपासून ते...

चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना अवघ्या...

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुका पोलिसांनी चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या अवघ्या दोन तासांत आवळत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या...

संपादक - रजत शेख

Latest