वरणगावात अनिल चौधरींना सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रतिसाद; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

Spread the love

वरणगाव (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांनी वरणगाव येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे व विविध पक्षांच्या नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत पक्षीय भेद बाजूला ठेवत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची भावना व्यक्त करण्यात आली.

बैठकीला भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच अपक्ष गटातील एकूण 17 नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शहर विकास, नागरी सुविधांचा विस्तार, स्थानिक स्वराज्य संस्थांपुढील विविध प्रश्न आणि आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.

उपस्थित लोकप्रतिनिधींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या प्रभावीपणे विधान परिषदेत मांडणाऱ्या सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित केली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण, प्रलंबित विकासकामांना गती देणे आणि लोकप्रतिनिधींच्या अपेक्षांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक वातावरणात विचारविनिमय झाला.

यावेळी बोलताना अनिल चौधरी म्हणाले की, “पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संस्थांचा प्रभावी आवाज विधान परिषदेत पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

बैठकीनंतर अनिल चौधरी यांनी नगराध्यक्ष सुनील काळे तसेच उपस्थित सर्व नगरसेवकांनी दिलेल्या सन्मान, आत्मीयता आणि शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त केले. या प्रसंगी विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest