मोफत कीटसाठी ‘शंभराची’ लाच; तरुणी एसीबीच्या जाळ्यात

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी ): शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत मोफत दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक व सुरक्षा संचासाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी करणाऱ्या एका तरुणीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. जळगाव तालुक्यातील वावडदा येथील वितरण केंद्रावर गुरुवारी झालेल्या या कारवाईत १०० रुपयांची लाच स्वीकारताना संबंधित तरुणी जाळ्यात अडकली. यावेळी घटनास्थळावरून तब्बल २६ हजार ७७० रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री पाटील (वय २०, रा. सामनेर, ता. पाचोरा) ही वावडदा येथील कीट वितरण केंद्रावर खाजगी स्वरूपात कार्यरत होती. जळगावातील एका बांधकाम कामगाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत अत्यावश्यक व सुरक्षा संच मिळविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानुसार त्यांना ४ जून रोजी वावडदा केंद्रावर कीट स्वीकारण्यासाठी बोलावण्यात आले होते.

केंद्रावर पोहोचल्यानंतर भाग्यश्री पाटील हिने केवायसी प्रक्रियेसाठी दोन फॉर्म खरेदी करावे लागतील, असे सांगत १०० रुपयांची मागणी केली. मात्र शासनाकडून मोफत दिल्या जाणाऱ्या या संचासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे अर्जावर स्पष्ट नमूद असल्याने तक्रारदाराला संशय आला. त्यांनी तत्काळ जळगाव एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने सापळा रचला. पंचांसमक्ष भाग्यश्री पाटील हिने १०० रुपयांची रक्कम स्वीकारताच पथकाने तिला ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान तिच्या अंगझडतीत १३ हजार ६७० रुपये रोख मिळून आले. तसेच वितरण केंद्रावरील झेरॉक्स मशीनजवळ ठेवलेल्या स्टीलच्या डब्यात आणखी १३ हजार १०० रुपये आढळून आले. केवायसीच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, एकूण २६ हजार ७७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेल्या रोकडबाबत तसेच संभाव्य गैरव्यवहाराबाबत अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, महिला पोलीस नाईक रेश्मा अवतारे, सुरेश पाटील, बाळू मराठे आणि राकेश दुसाने यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मेहरुणमध्ये एस.आय.आर. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण परिसरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २९ जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १०...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा,...

जळगाव(प्रतिनिधी ):जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा,...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विशाखा...

मेहरुण (प्रतिनिधी) : महिलांना कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानपूर्ण व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक...

संपादक - रजत शेख

Latest