जळगावात संतापजनक घटना; १५ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपी गजाआड

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी):

 शहरातील जैनाबाद परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी आहे. डिसेंबर २०२५ मध्ये आरोपीने तिला घरातून फूस लावून नेले. त्यानंतर तिला जैनाबाद येथील एका घरात ठेवण्यात आले. पुढे मुलीने दिलेल्या जबाबातून तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

हा प्रकार बाल कल्याण समितीसमोर मुलीने दिलेल्या निवेदनानंतर समोर आला. त्यानंतर पीडितेच्या आईने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे ४ जून २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत जैनाबाद येथील कृष्णा चंद्रभान तायडे याला ताब्यात घेत अटक केली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी प्रकरणाची माहिती घेतली. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेमुळे जळगाव शहरात संतापाची लाट उसळली असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलिसांची मध्यप्रदेशात संयुक्त धडक...

जळगाव : (प्रतिनिधी): फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीला आळा घालण्याच्या उद्देशाने जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलाने...

धुळे जिल्ह्यातील घरफोडी प्रकरण उघड; फरार दोन आरोपींना रामानंद...

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान): धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना जळगावच्या रामानंद नगर पोलिसांनी शिताफीने अटक करून मोठी कामगिरी बजावली...

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयात विविध क्लबांची स्थापना

मेहरुण (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी संस्थाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,...

संपादक - रजत शेख

Latest