ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : ७० लाखांचे एमडी ड्रग्ज व देशी पिस्तूल जप्त; तिघांना अटक

Spread the love

ठाणे(प्रतिनिधी) : ठाणे गुन्हे शाखा घटक-१ ने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ७० लाख रुपये किमतीचे ५००.०५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर आणि एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ७७ लाख ५५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा, घटक-१ चे पोलीस शिपाई सागर सुरळकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की काही व्यक्ती एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन जुना खारीगाव टोलनाका मार्गे जाणार आहेत. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी खारीगाव टोलनाका परिसरात सापळा रचला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी रहमान अब्दुल खान (वय २३, मुंब्रा), सिद्धांत संजय तांबोळी (वय ३१, दिवा) आणि साहील नसीम खान (वय १८, कळवा) यांना दोन दुचाकींसह ताब्यात घेतले. त्यांच्या तसेच वाहनांच्या झडतीमध्ये ५००.०५ ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ, एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि इतर साहित्य आढळून आले.

या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८८/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८(क), २२(क), २९ तसेच आर्म्स अॅक्ट कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपींनी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी ठाण्यात आणल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक आरोपींना न्यायालयाने २ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या रॅकेटमधील इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित यादव करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव व सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित यादव तसेच गुन्हे शाखा घटक-१ च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्मृती प्रवेश अभियान...

मेहरुण (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे स्वर्गीय सौ. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. १ जून २०२६...

राहुरीतील फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद; गावठी कट्ट्यासह २...

राहुरी (प्रतिनिधी): राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे घडलेल्या फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या काही तासांत मुळा धरण परिसरातून अटक केली....

गेवराई पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर...

गेवराई (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली...

संपादक - रजत शेख

Latest