ठाण्यात वर्तकनगर पोलिसांची मोठी कारवाई ३.१८० किलो गांजासह आरोपी जेरबंद

Spread the love

ठाणे(प्रतिनिधी):

अमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून ३.१८० किलो गांजा आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली वॅगनआर कार असा एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई २४ मे २०२६ रोजी दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास टीसीएस कंपनीकडून लेक शोर मॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश दिलीप मोरे (वय ३०) असे असून तो लुईसवाडी, वागळे इस्टेट परिसरातील साईनाथ नगर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गस्तीदरम्यान संशयित हालचालींवरून कारवाई

वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मेघराज जाधव आणि त्यांचे पथक परिसरात गस्त घालत असताना रस्त्याच्या कडेला उभी असलेली वॅगनआर कार आणि तिच्याजवळ संशयास्पद हालचाली करणारा इसम त्यांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी तात्काळ दोन पंचांसमक्ष एनडीपीएस कायद्यानुसार आरोपीची व वाहनाची झडती घेतली.

या झडतीत कारमधून ३.१८० किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वॅगनआर कारही पोलिसांनी ताब्यात घेतली.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०२/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यातील कलम ८(c) आणि २०(b)(ii)(b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मेघराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव, पोलीस नाईक पाटोळे, पोलीस कॉन्स्टेबल सुरवसे, नागरे आणि कात्राबाद यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मेहरुणमध्ये एस.आय.आर. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण परिसरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २९ जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १०...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा,...

जळगाव(प्रतिनिधी ):जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा,...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विशाखा...

मेहरुण (प्रतिनिधी) : महिलांना कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानपूर्ण व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक...

संपादक - रजत शेख

Latest