भोकरदनमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; पती-पत्नी व घरमालकावर गुन्हा दाखल

Spread the love

  • भोकरदन(प्रतिनिधी ): शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर भोकरदन पोलिसांनी शनिवारी दुपारी धाड टाकत पती-पत्नी आणि जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी पीडित महिलांची सुटका करत ३५ हजार ६८० रुपयांची रोकड जप्त केली आहे.
  • पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनीतील गजानन मंदिराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये बाहेरील जिल्ह्यातील महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दुपारी सुमारे २.४५ वाजता पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
  • या कारवाईत गणपत मधीन सेठी (वय ५४), गितांजली गणपत सेठी (वय ५१, दोघे रा. राजूर, ता. भोकरदन) तसेच जागा मालक ज्ञानेश्वर विनायक वाघ (रा. भोकरदन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • पोलिसांनी घटनास्थळावरून पीडित महिलांची सुटका केली असून रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच आरोपी पती-पत्नीविरुद्ध यापूर्वीही हसनाबाद पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
  • या प्रकरणी तिन्ही आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ (PITA) अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
  • ही कारवाई पोलीस अधीक्षक तेंधबिर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पीएसआय पवन राजपूत आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाने करत आहेत.

Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलिसांची मध्यप्रदेशात संयुक्त धडक...

जळगाव : (प्रतिनिधी): फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीला आळा घालण्याच्या उद्देशाने जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलाने...

धुळे जिल्ह्यातील घरफोडी प्रकरण उघड; फरार दोन आरोपींना रामानंद...

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान): धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना जळगावच्या रामानंद नगर पोलिसांनी शिताफीने अटक करून मोठी कामगिरी बजावली...

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयात विविध क्लबांची स्थापना

मेहरुण (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी संस्थाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,...

संपादक - रजत शेख

Latest