वर्षांपासून फरार असलेला “घर जाळण्याचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा” मास्टरमाइंड अखेर जेरबंद; जळगाव LCB ची मोठी कारवाई 🔥

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात २०२४ मध्ये घडलेल्या खुनाच्या प्रयत्न आणि घराला आग लावण्याच्या दोन गंभीर गुन्ह्यांतील तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेला मुख्य आरोपी अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) जाळ्यात अडकला आहे. विशाल अजय सुरवाडे (वय ३०, रा. राजमालती नगर, दूध फेडरेशनजवळ, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरत रेल्वे गेट परिसरात जुन्या वादातून मोठा संघर्ष झाला होता. यावेळी १२ ते १३ जणांच्या टोळीने रेहान उर्फ जानू संजू पटेल याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर आरोपी विशाल सुरवाडे याने त्याचा नातेवाईक सिद्धार्थ वानखेडे यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी साथीदारांसह राजू पटेल यांच्या घरावर हल्ला केला. आरोपींनी घरात मोठ्या प्रमाणावर तोडफोड करत घरातील साहित्याला आग लावून संपूर्ण घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन्ही गुन्ह्यांतील इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी विशाल सुरवाडे हा सतत ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देत होता.

दरम्यान, २० मे २०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना आरोपी जळगाव शहरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार LCB पथकाने सापळा रचून राजमालती नगर परिसरातून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपीला जळगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गुणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पीएसआय शरद बागल, एएसआय अतुल वंजारी तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

👉 दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर गजाआड; जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी!


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मेहरुणमध्ये एस.आय.आर. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण परिसरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २९ जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १०...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा,...

जळगाव(प्रतिनिधी ):जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा,...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विशाखा...

मेहरुण (प्रतिनिधी) : महिलांना कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानपूर्ण व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक...

संपादक - रजत शेख

Latest