निमखेडी रोडवरील अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील निमखेडी रोड परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या अवैध सेक्स रॅकेटचा तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

माहितीनुसार, संबंधित अपार्टमेंटमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुप्तपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री करून नियोजनबद्ध सापळा रचला. त्यानंतर अचानक छापा टाकत कारवाई करण्यात आली.

या धाडीत काही महिला तसेच संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून मोबाईल, रोख रक्कम आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधितांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. शहर व ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मेहरुणमध्ये एस.आय.आर. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण परिसरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २९ जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १०...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा,...

जळगाव(प्रतिनिधी ):जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा,...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विशाखा...

मेहरुण (प्रतिनिधी) : महिलांना कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानपूर्ण व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक...

संपादक - रजत शेख

Latest