रावेर पोलिसांची कारवाई; गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह तरुण अटकेत

Spread the love

रावेर : (प्रतिनिधी):

रावेर शहरातील बसस्थानकाच्या मागील बाजूस छोरीया मार्केटजवळ संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

 

पोलिसांना गुरुवारी (२० ऑगस्ट) गुप्त बातमीदारामार्फत बसस्थानकाच्या मागे एक इसम शस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने परिसरात जाऊन पाहणी केली असता छोरीया मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर राखाडी रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स परिधान केलेला तरुण संशयास्पदरीत्या आढळून आला.

 

पोलिस पथकाला पाहून त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला थांबवून पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या कमरेला खोचलेला तपकिरी रंगाचा लोखंडी धातूचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आढळून आला. तसेच त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली.

 

चौकशीत त्याने आपले नाव कृष्णा दत्तू पाटील (वय २०, रा. रोकडा हनुमान मंदिर नगर, रावेर) असे सांगितले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९८/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३ सह २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, आरोपीने हे शस्त्र कोठून मिळवले, कोणत्या उद्देशाने खरेदी केले तसेच त्याच्यासोबत अन्य कोणी साथीदार आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोक्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

 

कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकार शेख, प्रमोद पाटील, विशाल पाटील आणि संभाजी बिजागरे यांचा सहभाग होता.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest