इच्छादेवी चौकात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा धडाका; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे स्वतः रस्त्यावर

Spread the love

जळगाव : (प्रतिनिधी: इम्रान खान):

जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी जळगाव पोलिसांनी वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेदरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून इच्छादेवी चौकात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली.

हेल्मेटचा वापर न करणे, ट्रिपल सीट प्रवास, सिग्नलचे उल्लंघन तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करणे अशा नियमभंगांच्या प्रकारांवर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलीस अधीक्षक धिवरे यांनी वाहनचालकांशी संवाद साधत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.

वाहतूक नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून अपघात टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट, तर चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

या मोहिमेचा उद्देश केवळ दंडात्मक कारवाई करणे नसून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करणे हा देखील आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरल्याने वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होत असल्याचे चित्र इच्छादेवी चौकात पाहायला मिळाले.

 

जळगाव शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, हेल्मेटचा वापर करावा आणि निर्धारित वेगमर्यादेतच वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest