घरफोडीचा करणारी टोळी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात तिघे जेरबंद, ६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी :इमरान खान): शिरसोली प्र. बो. येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून ६ लाख ६८ हजार ७९० रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसोली प्र. बो. येथे राजेंद्र दौलत आंबटकर यांच्या घरात ३० एप्रिल रोजी रात्री ९ ते ५ मे रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान घरफोडी झाली होती. आंबटकर हे बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून चोरी केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्रमांक ३७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्याचा तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत होते. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून माहिती संकलित केली. तसेच तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली.

 

तपासादरम्यान मुन्ना शहा सुलतान शहा (वय २२, रा. ढोलकपूर पोलीस चौकी, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला बुऱ्हाणपूर येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच मुख्य सराईत आरोपी मुस्तकीन उर्फ जुनेद भिकन शहा (वय २३, रा. बिस्मिल्ला चौकी, तांबापुरा, जळगाव, हल्ली रा. शिरसोली) याला सैलानी, धाड, जिल्हा बुलडाणा येथून ताब्यात घेण्यात आले. तिसरा आरोपी जाबीर शहा जावेद शहा (वय २०, रा. मुस्लिम कॉलनी, बडी खानजवळ, भुसावळ) याला भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तकीन उर्फ जुनेद शहा याच्याविरुद्ध रामानंदनगर, पारोळा, भुसावळ, जिल्हापेठ आदी पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.

 

सोन्याचे दागिने, रोकड व दुचाकी जप्त

 

आरोपींकडून पोलिसांनी १० हजार रुपये रोख, ३ लाख ६० हजार ७९० रुपये किमतीचे २६.७८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे फॅन्सी शॉटपोत, ३८ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या कानातील रिंग, ७० हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, १ लाख ४० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि ५० हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची सीबीझेड मोटारसायकल, असा एकूण ६,६८,७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

पोलिसांच्या पथकाची कारवाई

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, शशिकांत मराठे आणि योगेश घुगे यांनी ही कारवाई केली


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

वाढवणा हद्दीत ५.८७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

संपादक - रजत शेख

Latest