एमआयडीसी पोलिसांनी गावठी कट्ट्यासह दहशत माजवणाऱ्यास जेरबंद केले

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान):एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुसुंबा विमानतळ परिसरात गस्तीदरम्यान गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून सुमारे 30 हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला आहे.

 

दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास पोलीस अंमलदार किरण प्रकाश पाटील (बकल नं. 342) व पोलीस अंमलदार शशिकांत हिरामन मराठे (बकल नं. 1395) हे कुसुंबा विमानतळ शिवारात गस्त घालत असताना त्यांना एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्याची चौकशी केली असता त्याच्या कमरेला लोखंडी वस्तू असल्याचे निदर्शनास आले. अधिक विचारपूस केली असता ती वस्तू गावठी कट्टा असल्याची माहिती समोर आली.

 

याबाबतची माहिती तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलिक धनके यांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहायक फौजदार विजयसिंग धनसिंग पाटील, पोलीस नाईक प्रदीप आनंदा चौधरी, पोलीस अंमलदार रमाकांत ज्ञानेश्वर साळुंखे, राहुल मिलिंद घंटे व पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश चौधरी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.

 

संशयित इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव राजकिरण मानसिंग परदेशी (वय 26, रा. रायपूर, ता. जि. जळगाव) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेतून मॅगझीनसह एक गावठी बनावटीचा सिल्व्हर रंगाचा कट्टा जप्त करण्यात आला. या शस्त्राची अंदाजे किंमत 30 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

या प्रकरणी पोलीस अंमलदार किरण प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्रमांक 661/2026 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार विजयसिंग धनसिंग पाटील व पोलीस नाईक मोतीलाल बोरसे करीत आहेत.

 

अटक आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest