शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; 24 तासांत चोरीचा गुन्हा उघड, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी ):दि. 8 : शनिपेठ पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या 24 तासांत वेल्डिंग मशीन व ग्राइंडर मशीन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, आरोपीला अटक करून सुमारे 52 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील भवानीपेठ परिसरातील नोबल मार्केटिंग अँड मीडिया सोल्युशन या दुकानातून 3 वेल्डिंग मशीन व 16 ग्राइंडर मशीनचे बॉक्स अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. या प्रकरणी 6 ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 162/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून विविध धागेदोरे गोळा करण्यात आले.

 

गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी वसीम शेख हसन (वय 29, रा. भिरपुला, जळगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या 3 वेल्डिंग मशीन व 16 ग्राइंडर मशीनचे बॉक्स असा एकूण 52 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय खैरे करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक कटारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश जाधव, विजय खैरे तसेच पोलीस कर्मचारी अमोल वंजारी, पराग दुसाने, निलेश घुगे, नवजित चौधरी, गणेश ढाकणे आणि योगेश साबळे यांनी सहभाग घेतला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest