नागपुरात 1 किलो 145 ग्रॅम गांजासह युवक ताब्यात; एक आरोपी फरार

Spread the love

नागपूर(प्रतिनिधी ):दि. 5 ऑगस्ट : नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितार ओळी, नागोबा गल्ली क्रमांक 2 येथे धाड टाकून 1 किलो 145 ग्रॅम गांजासह एका युवकाला ताब्यात घेतले. या कारवाईत गांजा व मोबाईलसह एकूण 43 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख जुबेर शेख आबीद (वय 25, रा. चितार ओळी, महाल) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

 

या प्रकरणातील दुसरा आरोपी शेख इम्तियाज शेख जब्बार (वय 65) हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत सहा गुन्हे तसेच तहसील पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 4 ऑगस्टच्या रात्री ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 1 किलो 145 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(ब)(2)(ब) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest