स्थानिक गुन्हे शाखेची वाहन चोरीविरोधात कारवाई; ३० हजारांची चोरीची मोटारसायकल हस्तगत, आरोपी जेरबंद

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत ३० हजार रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल हस्तगत केली असून एका रेकॉर्डवरील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

पोलीस अधीक्षक [नाव] यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरीच्या उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक [नाव] यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून तपास सुरू केला होता.

 

दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे विभोर जुलाल जाधव (रा. एरंडोल, सध्या रा. विवरे खुर्द, ता. रावेर) याच्याकडे असलेली हिरो डिलक्स मोटारसायकल (क्र. MH-19-BT-9433) चोरीची असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने विवरे खुर्द येथे जाऊन संशयिताला ताब्यात घेतले.

 

चौकशीदरम्यान संबंधित मोटारसायकलीची कागदपत्रे सादर करण्यास तो अपयशी ठरला. अधिक तपासात त्याने जळगाव महानगरपालिकेच्या पार्किंगमधून सदर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

 

यानंतर जिल्हा गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता, जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२३, भादंवि कलम ३७९ अन्वये वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले.

 

आरोपीविरुद्ध यापूर्वीही घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३० हजार रुपये किमतीची लाल-काळ्या रंगाची मोटारसायकल जप्त केली असून पुढील तपास जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोहेकों / नंदलाल पाटील हे करीत आहेत.

 

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, श्री. संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अनिल बडगुजर, उपविभागीय पोलीस अधिकारी, फेजपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील पोलीस उप-निरी/सोपान गोरे, पोहेकों/लक्ष्मण पाटील, पोना/राहुल पाटील, पोकों/ जितेंद्र पाटील, पोकों/भुषण पाटील, पोकों/राहुल महाजन यांचे पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरची दुचाकीला धडक; भाजी...

जळगाव(इमरान खान) : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात भाजी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा जागीच...

व्यसनाला नकार, जीवनाचा स्वीकार; विद्यार्थ्यांचा नशामुक्त भारताचा संकल्प

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरून येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे आरोग्य व कल्याण समितीच्या वतीने "व्यसन विरुद्ध जीवन"...

नाडगावातील देशी दारू दुकान फोडले; ३९ हजारांचा मद्यसाठा लंपास

बोदवड(प्रतिनिधी ):तालुक्यातील नाडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी सरकारी मान्यताप्राप्त देशी दारू दुकानाचे शटर वाकवून सुमारे ३९ हजार रुपयांचा मद्यसाठा चोरून नेल्याची घटना समोर आली आहे....

संपादक - रजत शेख

Latest