मास्टर कीने मोटारसायकल चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद; चार दुचाकींसह 1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत मास्टर कीच्या सहाय्याने मोटारसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक केली. आरोपीकडून चोरीच्या चार बजाज प्लॅटिना मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत 1 लाख 20 हजार रुपये आहे.

 

जिल्ह्यात तसेच पाचोरा शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अमोल राजेंद्र ढमाळे (वय 27, रा. नंदीचे खेडगाव, ता. पाचोरा, ह.मु. काळे नगर, जळगाव) हा जळगाव रोडलगत एका शेतातील शेडमध्ये लपून राहत असल्याचे समजले.

 

पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मास्टर कीच्या सहाय्याने चार बजाज प्लॅटिना मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीच्या चारही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

 

या मोटारसायकलींची चोरी झाल्याप्रकरणी पाचोरा, भडगाव आणि एमआयडीसी वाळूज (छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यांमध्ये बीएनएस कलम 303(2) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात सपोनि प्रदीप शेवाळे, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ तसेच गुन्हे पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest