भिवंडी गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चैन स्नॅचिंगच्या दोन टोळ्या जेरबंद, १० गुन्हे उघड

Spread the love

भिवंडी(प्रतिनिधी ):दि. २४ जुलै : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील जबरी चोरी व चैन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडीने मोठी कारवाई करत दोन स्वतंत्र टोळ्यांतील तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत चैन स्नॅचिंगचे ९ आणि मोटारसायकल चोरीचा १ असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले असून, ११ लाख १२ हजार रुपये किमतीचे १४८ ग्रॅम सोन्याचे दागिने व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

 

मा. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल शोधून काढली. त्यावर पाळत ठेवून सापळा रचण्यात आला. पोलिसांना पाहताच आरोपीने म्हारळ परिसरातील जंगलात पळ काढला. मात्र पोलीस शिपाई सर्फराज तडवी यांनी सुमारे दोन किलोमीटर पाठलाग करून कासीम जाफर हुसेन (वय २६, रा. आंबीवली, ता. कल्याण) याला ताब्यात घेतले.

 

चौकशीत कासीमने आपल्या तीन साथीदारांसह ७ चैन स्नॅचिंग आणि १ मोटारसायकल चोरी अशा ८ गुन्ह्यांची कबुली दिली. हे गुन्हे भिवंडी शहर, बदलापूर पूर्व, खडकपाडा (कल्याण), मानपाडा (डोंबिवली), कळवा आणि श्रीनगर (ठाणे) या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडल्याचे उघड झाले.

 

याच तपासादरम्यान दुसऱ्या टोळीतील गोविंद लड्डू काळे (वय ३४, रा. परतूर, जि. जालना) आणि गोविंद बापुराव चव्हाण (वय ३२, रा. मुलुंड पूर्व, मुंबई) यांना स्थानिक पोलिसांच्या मदतीने परतूर येथून अटक करण्यात आली. या दोघांनी नारपोली (भिवंडी) आणि माजलगाव (बीड) परिसरातील दोन चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

 

दोन्ही टोळ्यांकडून एकूण १४८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोटारसायकल असा ११.१२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; 24 तासांत चोरीचा गुन्हा उघड,...

जळगाव(प्रतिनिधी ):दि. 8 : शनिपेठ पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या 24 तासांत वेल्डिंग मशीन व ग्राइंडर मशीन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, आरोपीला अटक...

नागपुरात 1 किलो 145 ग्रॅम गांजासह युवक ताब्यात; एक...

नागपूर(प्रतिनिधी ):दि. 5 ऑगस्ट : नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितार ओळी, नागोबा गल्ली क्रमांक 2 येथे धाड...

रावेर गुन्हे शोध पथकाची आभोडा येथे धाड; गोमांस विक्री...

रावेर (प्रतिनिधी):   रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आभोडा गावात अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत एकाला अटक केली असून एक संशयित फरार झाला...

संपादक - रजत शेख

Latest