वरणगाव पोलिसांची अवैध गुटखा तस्करीविरोधात धडक कारवाई; ५.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

Spread the love

वरणगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत वरणगाव पोलिसांनी अवैध गुटखा तस्करीवर मोठी कारवाई करत ५ लाख १७ हजार ८६८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार जप्त केली. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने वरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांना २४ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मुक्ताईनगर–भुसावळ मार्गावरील कपील वस्ती परिसरातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पानमसाल्याची वाहतूक होत आहे.

 

माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला. कारवाईदरम्यान सिल्व्हर रंगाची इनोव्हा (क्र. एमएच-२० बीडी-३०००) अडवून तपासणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आली. याप्रकरणी चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८, रा. खालची आळी, नशिराबाद, जि. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.

 

घटनास्थळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला. त्यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९७/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २४७, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमान्वये पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

 

या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार असा एकूण ५,१७,८६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या नेतृत्वाखाली वरणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.

 

यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक हा दंडनीय गुन्हा असल्याचे सांगितले. अशा प्रकारची बेकायदेशीर माहिती आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest