झीरो फेटालिटी मोहिमेत १२४ वाहनचालकांवर कारवाई; १.७१ लाखांचा दंड

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी):

जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे २४ जुलै २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या ‘झीरो फेटालिटी’ विशेष मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण १२४ प्रकरणे नोंदवून १ लाख ७१ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

कारवाईदरम्यान १८ अल्पवयीन चालक, ३४ विनापरवाना वाहनचालक, ४ तीन आसनी उल्लंघन (थ्री-सीट), १० विना सीटबेल्ट तसेच इतर ५८ वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.

ही मोहीम जळगाव शहरातील इच्छादेवी चौक, देविदास कॉलनी, न्यू जोशी कॉलनी आणि सिंधी कॉलनी परिसरात नाकाबंदी करून राबविण्यात आली. विशेषतः अल्पवयीन चालक आणि फ्रेंडशिप रिक्षांवर लक्ष केंद्रित करून तपासणी करण्यात आली.

 

या मोहिमेचे नेतृत्व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी केले. त्यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गांगुर्डे आणि इतर दहा पोलीस अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.

 

आकारण्यात आलेल्या दंडापैकी ५ हजार ५०० रुपये दंड घटनास्थळीच वसूल करण्यात आला. भविष्यातही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest