भुसावळात पुन्हा गोळीबार; दगडी पुला परिसरात हनुमान मंदिराजवळ थरार

Spread the love

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास दगडी पुला परिसरातील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली.

 

प्राथमिक माहितीनुसार, गोलू रायसिंग पंडित हे त्यांच्या घरासमोरील ओट्यावर बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी कथितरित्या गावठी कट्ट्यातून त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

 

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.

 

दरम्यान, या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. किती गोळ्या झाडण्यात आल्या, या घटनेत कोणी जखमी झाले का, तसेच हल्लेखोरांची ओळख काय आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

 

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest