अजंदा रेल्वे पुलाजवळील लूटप्रकरण उघड; रावेर पोलिसांची २४ तासांत तिघांना अटक

Spread the love

रावेर(प्रतिनिधी ):दि. ६ : रावेर तालुक्यातील अजंदा गावाजवळील रेल्वे पुल परिसरात बांधकाम ठेकेदाराला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे लुटणाऱ्या तिघा आरोपींना रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.

 

याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३५१(२)(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

फिर्यादी शेख जाबीर शेख अमान (वय ४१, रा. फारुकी आझम कॉलनी, विनावल, ता. रावेर) हे बांधकाम ठेकेदार असून मजुरांच्या शोधात नेहमी फिरत असतात. या माहितीचा फायदा घेत आरोपी मुस्तकीम याने मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून त्यांना विवरा येथे बोलावले. त्यानंतर मजूर अजंदा येथे असल्याचे सांगत रेल्वे पुलाजवळ नेले.

 

तेथे आधीपासूनच थांबलेल्या दोन साथीदारांसह आरोपींनी फिर्यादीला शेतात नेले. एका आरोपीने चाकूचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. फिर्यादींकडे असलेले ५०० रुपये घेतल्यानंतर त्यांचा मोबाईल हिसकावून फोन-पेचा पिन जबरदस्तीने विचारला आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे सुमारे ८ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग करून तिघे पसार झाले.

 

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. रात्रीची वेळ असल्याने आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी वाहनाबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तपासाची दिशा निश्चित झाली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने संशयित मुस्तकीमला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर अन्य दोघांनाही अटक करण्यात आली.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख मुस्तकीम शेख अकील (२२, रा. फतेहनगर, रावेर), शेख मोईन शेख नईम (१९, रा. खिर्डी रोड, विवरा) आणि फैजल बेग हितायत बेग (१९, रा. शंकर प्लॉट, रावेर) यांचा समावेश आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एमएच-१९-ईडी-५५८० क्रमांकाची दुचाकी व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी शेख मोईन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारच्या लुटीचा गुन्हा दाखल आहे. या टोळीने आणखी काही लुटीचे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

न्यायालयाने तिन्ही आरोपींना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन पुढील तपास करत आहेत.

 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest