जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; मोटारसायकल चोरटा जेरबंद, चोरीची दुचाकी जप्त

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी):

जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरीप्रकरणी तातडीची कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे २५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दस्तगीर अल्लाउद्दीन पिंजारी (वय ४३, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांनी ३० जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २९ जूनच्या रात्री त्यांच्या घरासमोर उभी असलेली एमएच-१९-बीसी-५१६२ क्रमांकाची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्याचबरोबर जवळील भंगार दुकानाचे शटर उचकावून सुमारे ६,३०० रुपये किमतीचे पितळाचे तुकडे व पिनाची बटणे चोरी करण्यात आली होती.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०५८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) व ३३४(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे शाहरुख खान सलीम खान (वय २६, रा. इंद्रप्रस्थ नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेतले.

कसून चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली २५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल हस्तगत करून जप्त करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीश पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीश पाटील, प्रमोद लांडगेसरी आणि पोलीस नाईक मोतीलाल बोरसे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; 24 तासांत चोरीचा गुन्हा उघड,...

जळगाव(प्रतिनिधी ):दि. 8 : शनिपेठ पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या 24 तासांत वेल्डिंग मशीन व ग्राइंडर मशीन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, आरोपीला अटक...

नागपुरात 1 किलो 145 ग्रॅम गांजासह युवक ताब्यात; एक...

नागपूर(प्रतिनिधी ):दि. 5 ऑगस्ट : नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितार ओळी, नागोबा गल्ली क्रमांक 2 येथे धाड...

रावेर गुन्हे शोध पथकाची आभोडा येथे धाड; गोमांस विक्री...

रावेर (प्रतिनिधी):   रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आभोडा गावात अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत एकाला अटक केली असून एक संशयित फरार झाला...

संपादक - रजत शेख

Latest