धरणगावातील घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटक, एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात

Spread the love

धरणगाव (प्रतिनिधी): धरणगाव शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून ७५ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुटुंबासह २३ मार्च २०२६ रोजी देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला. याप्रकरणी ३१ मार्च २०२६ रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३/२०२६ भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथकाची स्थापना करून तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करत आरोपींचा माग काढला.

 

तपासादरम्यान संदीप थोरात (वय २६, रा. एकता नगर, संजयनगर, धरणगाव) आणि कार्तिक उर्फ आबा महाजन (वय २०, रा. एकता नगर, संजयनगर, धरणगाव) यांना अटक करण्यात आली. तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तिघांनीही घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर बालकाला बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात आले.

 

आरोपींकडून ६२ हजार रुपये रोख, ८९ ग्रॅम वजनाची सुमारे ३ हजार रुपये किमतीची चांदीची लगड तसेच ३.१२० ग्रॅम वजनाची सुमारे १० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार तसेच विष्णू बिन्हाडे, दीपक माळी, रविंद्र पाटील, ईश्वर पाटील, रावसाहेब पाटील आणि महेश सोमवंशी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest