जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक आरोपी जेरबंद

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला अटक केली. आरोपीकडून सुमारे २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा (मॅगझीनसह) जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जळगाव विमानतळासमोरील कुरुंबा परिसरातून धनवड गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळी सापळा रचला.

यावेळी संशयित इसम पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची कायदेशीर अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्या कमरेला खोचलेला लोखंडी काळ्या रंगाचा गावठी कट्टा (मॅगझीनसह) आढळून आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश श्रावण सोनवणे (वय २४, रा. कुरुंबा, ता. जि. जळगाव) असे आहे. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७९/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), ३७ (३) व १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व त्यांच्या विशेष पथकाने केली. पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात स्वागत होत आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest