जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; घरफोडीचा गुन्हा अवघ्या पाच तासांत उघड, दोन अट्टल चोर जेरबंद

Spread the love

जळगाव( प्रतिनिधी):

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या पाच तासांत उघडकीस आणत जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रकरणी दोन अट्टल चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला सुमारे ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जिल्ह्यात वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, २५ जून रोजी रात्री १० ते २६ जून रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान शिवाजीनगर येथील सुशील भाईलाल भावसार (वय ६१) यांच्या घरात घरफोडी झाली. चोरट्यांनी डेल कंपनीचा लॅपटॉप, सॅमसंगचा मोबाईल, नोकिया अँड्रॉइड मोबाईल, पितळी कळशी व तीन हजार रुपये रोख असा एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी राफत शेख फिरोज (वय २०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) आणि शेख शारीम शेख मुसेफ उर्फ मुसाब (वय २०, रा. सिंहगड, शिवाजीनगर हुदको, जळगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून चोरीस गेलेला डेल लॅपटॉप, सॅमसंग मोबाईल, नोकिया अँड्रॉइड मोबाईल, पितळी कळशी आणि तीन हजार रुपये रोख असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सुनिल पाटील, दीपक शिरसाट, उमेश भांडारकर, सतीश पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार आणि भगवान मोरे यांनी केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest