गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी):

जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावाजवळ गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत १७ लाख ५० हजार रुपये किमतीची सहा वाहने जप्त केली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये स्वराज ७४४ एफई ट्रॅक्टर, टाटा १६१३ डंपर, अशोक लेलँड डंपर, टाटा ट्रक तसेच अन्य दोन डंपर अशी एकूण सहा वाहने जप्त करण्यात आली. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे १७ लाख ५० हजार रुपये असल्याचे महसूल विभागाने सांगितले.

या प्रकरणी सतीश एकनाथ कुंभार, गणेश संजय कोळी, अब्दुल करीम शेख, रविंद्र गिरधर जाधव, रितेश अनिल कोळी, विशाल सुनील सपकाळे आणि भूषण सपकाळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२), ४९, ५४ व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आर्थिक फायद्याच्या उद्देशाने गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक करत होते. कारवाईची चाहूल लागताच संबंधितांनी वाहने घटनास्थळी सोडून पळ काढला. जप्त वाहने ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश देविदास पाटील करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest