घरफोडी प्रकरण उघड; 73,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी जेरबंद

Spread the love

नांदेड(प्रतिनिधी):

नांदेड जिल्ह्यातील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 73 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

डॉ. नीलाभ रोहन यांनी मालमत्तेविषयक गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्यानंतर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुवड व त्यांच्या पथकाने 26 जून 2026 रोजी शंकरराव चव्हाण चौक बायपास परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली.

बोंडारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील इरफान टायर वर्क्सजवळ छापा टाकून शेख रेहान ऊर्फ चिल्ला शेख महेबूब (वय 21) आणि मोहम्मद रेहान ऊर्फ रिझवान ऊर्फ पुष्पा मोहम्मद इलियास (वय 20) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 73,700 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

चौकशीदरम्यान आरोपींनी मेहबूबनगर आणि ओंकारेश्वर नगर परिसरातील दोन बंद घरांचे कडी-कोंडे तोडून घरफोडी केल्याची कबुली दिली. घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. चोरीचा मुद्देमाल विकून त्यातून मिळालेली रक्कम आपसात वाटून घेण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी संबंधित विमानतळ पोलीस स्टेशन, नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest