मुरूड पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई; 1.34 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत

Spread the love

लातूर( प्रतिनिधी):

लातूर जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मुरूड पोलिसांनी मोठी कारवाई करत 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अवैध देशी दारूसाठ्यासह एक कार जप्त करण्यात आली असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जून रोजी सकाळी सुमारे 9.20 वाजता अंकोली परिसरात ही कारवाई करण्यात आली. एका कारमधून अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मुरूड पोलिसांनी सापळा रचून मारुती सुझुकी आल्टो (एमएच-24 सी-7954) या वाहनाची तपासणी केली.

तपासणीदरम्यान वाहनातून ‘सिमला संत्रा’ व ‘टँगो पंच’ या ब्रँडच्या 90 एमएल क्षमतेच्या 1,600 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या दारूसाठ्याची किंमत 64 हजार रुपये असून, 70 हजार रुपये किमतीच्या कारसह एकूण 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी महेश लक्ष्मण गायकवाड (24, रा. खंडापूर) आणि महादेव शंकर गायकवाड (42, रा. खंडापूर) यांना अटक करण्यात आली आहे. कोणताही वैध परवाना नसताना आर्थिक फायद्यासाठी अवैध देशी दारूची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा नेला जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 195/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65(अ)(ई), 81 व 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक रामदास बलभीम नाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंधारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रामदास नाडे, सहायक फौजदार दशरथ गिरी, रामचंद्र जाधव, पोलीस अमलदार हणमंत माने व कोळी यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस अमलदार हणमंत माने करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

वाढवणा हद्दीत ५.८७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

संपादक - रजत शेख

Latest