मेहरूण तलाव परिसरात गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान):एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मेहरूण तलाव परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करत त्याच्याकडून सुमारे १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, मेहरूण तलाव परिसरात एक व्यक्ती विनापरवाना गावठी कट्टा बाळगून फिरत असून दहशत माजवत आहे. ही माहिती पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तातडीने सापळा रचला.

पथकाने मेहरूण ट्रॅक परिसरातील सुबोनिया पक्षीघराजवळ संशयिताला पाहिले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलीस कर्मचारी गणेश ठाकरे व रमाकांत साळुंखे यांनी पाठलाग करून त्याला जागीच पकडले.

चौकशीत त्याने आपले नाव समीर खान जावेद खान (वय २५, रा. बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून मॅगझीनसह सुमारे १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७३/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व गुन्हे शोध पथकाने केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest