चाळीसगाव शहरात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन; १९ तलवारी, १० कोयते जप्त

Spread the love

चाळीसगाव(प्रतिनिधी) : चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे मंगळवारी (दि. २४ जून) पहाटे २ ते ४ वाजेदरम्यान शहरात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत १९ तलवारी, १० कोयते आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विविध गुन्ह्यांमध्ये अनेकांवर कारवाई करण्यात आली.

पोलीसांनी नवाब नगर, धुळे रोड परिसरातील एका घरावर छापा टाकला असता आरती किरण देहे (रा. इंदिरा नगर, चाळीसगाव, ह.मु. नवाब नगर) व महेंद्र रंगनाथ हताळे (रा. नारायण वाडी, चाळीसगाव) हे धारदार शस्त्रे विक्रीसाठी बाळगत असल्याचे आढळून आले. त्यांच्या ताब्यातून १८ तलवारी व १० कोयतेसदृश धारदार हत्यारे जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियम व मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच फरीद खान शाबीर खान (रा. नागर रोड झोपडपट्टी, चाळीसगाव) याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्धही शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान ८० रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४४ आरोपी घरी आढळून आल्याने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून समज देण्यात आली.

याशिवाय सुमारे ३१ लाख रुपये किंमतीची तीन चारचाकी वाहने ताब्यात घेऊन संबंधितांवर मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये कारवाई करण्यात आली. न्यायालयाकडून प्राप्त आठ पकड वॉरंट तसेच तीन समन्सचीही बजावणी करण्यात आली.

दारूबंदी मोहिमेंतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून ६० लिटर गावठी हातभट्टीची दारू व सुमारे एक हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले.

ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेरे यांच्या नेतृत्वाखाली सहा अधिकारी, ६० पोलीस अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तसेच तीन आरसीपी प्लाटूनच्या जवानांनी या मोहिमेत सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

बंद घर फोडून चोरी करणारे तिघे जेरबंद; 23 हजारांचा...

जळगाव(प्रतिनिधी) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू नगर परिसरात बंद घर फोडून चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 23 हजार रुपये...

शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई; पाच वाहनचोरीचे गुन्हे उघड, सहा...

लातूर, दि. २३ (प्रतिनिधी) :वाहनचोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी प्रभावी कारवाई करत पाच वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल केली असून एका आरोपीला अटक...

रावेर गुन्हे शोध पथकाची कारवाई : दोन अट्टल दुचाकी...

रावेर (प्रतिनिधी) : रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत दोन अट्टल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या...

संपादक - रजत शेख

Latest