शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई; पाच वाहनचोरीचे गुन्हे उघड, सहा मोटारसायकली जप्त

Spread the love

  • लातूर, दि. २३ (प्रतिनिधी) :वाहनचोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी प्रभावी कारवाई करत पाच वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २ लाख १० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
  •  
  • पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेला आरोपी सतीश सुभाष कदम (वय ३४, रा. चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
  •  
  • वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना शिवाजीनगर पोलिसांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने विविध ठिकाणी केलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
  •  
  • तपासात शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन, गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील दोन, लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एक तसेच आंध्र प्रदेशातील एका गुन्ह्यासह एकूण पाच गुन्ह्यांमधील सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त वाहनांची एकूण किंमत अंदाजे २ लाख १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
  •  
  • या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली असून आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
  •  
  • ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार संजय फुलारी तसेच पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, बालाजी कोतवाड, प्रशांत ओगले, किशोर माने, परमेश्वर अंकुलगे आणि नारायण शिंदे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

वाढवणा हद्दीत ५.८७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

संपादक - रजत शेख

Latest