पिंपरखेड मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद; ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपरखेड येथील मारोती मंदिरातील चांदीचे मुकुट व कानातील चांदीच्या मासोळ्या चोरीप्रकरणी पारोळा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेला सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजेच्या सुमारास एक अनोळखी इसम पिंपरखेड येथील मारोती मंदिरात आला होता. काही वेळ मंदिरात थांबून दर्शन घेतल्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर मंदिराचे पुजारी आसाराम त्र्यंबक पाटील (रा. बहादरपूर, ता. पारोळा) यांनी मंदिर बंद करून विश्रांती घेतली.

दि. ९ जून रोजी सकाळी साडेपाच वाजता मंदिराची साफसफाई करत असताना मारोती मूर्तीवरील सुमारे ५०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट आणि कानातील सुमारे १५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मासोळ्या गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ६५ हजार रुपये असल्याची फिर्याद पारोळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान हिरापूर (ता. पारोळा) येथील हिरालाल अरुण पाटील यास ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने दि. ८ जूनच्या रात्री पिंपरखेड मारोती मंदिरातून चांदीचा मुकुट व कानातील चांदीच्या मासोळ्या चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीच्या राहत्या घरातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस हवालदार कैलास साळुंखे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि एसडीपीओ अमळनेर विभाग विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन, पोलीस हवालदार कैलास साळुंखे, संदीप सातपुते तसेच पथकातील अजय बाविस्कर, आकाश माळी, सुनील पाटील, अभिजित पाटील, गिरीश सोनवणे व अनिल राठोड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest